नाशिक – शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणा-याला गंगापूर पोलिसांनी गजाआड करुन सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. राहुल मुसळे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रिकवरी एजंटचे काम करत असलेला संशयित आरोपी राहुल मुसळे याला दुचाकी सोडण्याचा पुरेपूर ज्ञान असल्याने त्याचा फायदा घेत त्याने शहर परिसरातून २० हून अधिक दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. यामध्ये गंगापूर पोलीस स्टेशन कडील एक, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली, या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आणले आहेत. आतापर्यंत मुसळे याच्याकडून सहा लाख ६८ हजारांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.तेव्हा त्यांना सिटी सेंटर मॉल परिसरात संशयित मुसळे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी सापळा रचून मुसळेला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे असेल मोटर सायकल देखील चोरीची असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर इतर गुन्हेही उघडकीस आले. ही कारवाई पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपयुक्त अमोल तांबे , सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस स्टेशन रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.