नाशिक – युवतीवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन हा अत्याचार केल्याचे युवतीने तक्रारीत म्हटले आहे. पीडित युवती ही नाशिकरोड परिसरात राहते. या युवतीशी आरोपी वैभव भाऊसाहेब शेजवळ (वय २३, रा. गोल्डन स्टार अपार्टमेंट, कलानगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) याने ओळख वाढविली. काही दिवसांनी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शेजवळ याने युवतीचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर शेजवळ याने या मुलीला मुंबई नाक्यावरील ओयो हॉटेल, शालिमार येथील पूजा हॉटेल व अंबड येथील ओयो हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या कालावधीत घडला. दरम्यान या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी वैभव शेजवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.