नाशिक – सिडकोत शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या चार जणांपैकी एकावर पोलिसांनी एक वर्षाकरीता तडीपारीची कारवाई केली आहे. या चारपैकी संशयित केतन गणेश भावसार यास परिमंडळ २ उपायुक्त विजय खरात यांनी एक वर्षाकरीता नाशिक शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्याचे आदेशीत केले. भावसार यास जळगाव येथे त्याच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले. नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेरील पाणीपुरीच्या गाडीच्या काचा चार जणांनी फोडल्या होत्या. यात वैभव रणजित लोखंडे (१९ ,रा, अंबड ), वैभव गजानन खिरकाडे (२८ ,रा, मेहरधाम पंचवटी ) अविनाश शिवाजी गायकवाड (३२, शुभम पार्क, अंबड ) केतन गणेश भावसार (१९, रा. राजरत्न नगर) यांच्यायह एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख यांनी संशयितांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते.
पहाडी बाबा डोंगरावर एकाने केली आत्महत्या
नाशिक – नाशिक रोडला एकलहरे परिसरातील पहाडी बाबा डोंगरावर गळफास घेउन एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आले. कृष्णा रमेश डिग्रसकर (वय २५, इंदिरानगर झोपडपट्टी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २५) रात्री साडे दहाला हा प्रकार लक्षात आल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. काकवीपुरे यांनी मृत घोषीत केले.