नाशिक – सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू
नाशिक – कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. जेबीएम कंपनीमध्ये सोलरचे काम सुरु असताना या मजुराचा मृत्यू झाला. संजय यादव असे परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. या मजुरास अगोदर खासगी व नंतर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटना घडल्यानंतर सातपूर पोलिस घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी या घटनेची माहिती घेतली.
लोखंडी पेटीतून चोरट्यांनी ७० हजार केले लंपास
नाशिक – शरणपूरोडवरील मिशनमळा भागात बंद खोलीतील लोखंडी पेटीतून चोरट्यांनी ७० हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसीनमलू बंडेप्पा धनगर (रा.मिशनमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. धनगर यांची बंद खोली उघडून चोरट्यांनी लोखंडी पेटीचे कुलूप तोडून ७० हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.