रूग्णालयात गोंधळ घालणार्यांवर गुन्हा
नाशिकः रूग्णावर योग्य प्रकारे उपचार न केल्याचा आरोप करत कॅनडा कॉर्नर येथील एका रूग्णालयात गोंधळ घालणार्या रूग्णाच्या ७ नातेवाईकांवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती, संस्था अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश नाईक, निखिल नाईक व इतर ५ नातेवाईक (पुर्ण नावे, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. कविता कुणाल दराडे (रा. विंचुर येवला) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या कॅनडा कॉर्नर येथील पॅनोसिया रूग्णालयात दाखल करण्यात आलेली रूग्ण प्रियंका हिच्यावर योग्य उपचार न केल्याचा आरोप करत संशयितांनी रूग्णायात गोंधळ घालत डॉक्टर तसेच कर्मचार्यांना शिवीगाळ केली. तसेच कामात अडथळा आणला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..