नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाका भागात स्पिडब्रेकरवर तोल जावून पडल्याने ५१ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजश्री किशोर पिंगळे (रा.जऊळके फाटा,दहावा मैल,ओझर) असे मृत महिलेचे नाव आहे. राजश्री पिंगळे या पती किशोर पिंगळे यांच्या समवेत दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पिंगळे दांम्पत्य नाशिक पुणे रोडने दुचाकीवर प्रवास करीत असतांना शिंदेगाव येथील टोलनाका येथे स्पिडब्रेकरवर राजश्री पिंगळे या धावत्या दुचाकीवरून पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने पती पिंगळे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.धुम यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.