नाशिक : एटीएम कार्डचा वापर करीत ६६ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीची संधी साधत पाकिट मारणा-या चोरट्याने एटीएम कार्ड चोरले त्यानंतर हे पैसे काढले. अशोक दशरथ भांगरे (६४, रा. सोनाली अपार्टमेंट, विसे मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल दिली आहे. भांगरे हे २६ नोव्हेंबर रोजी शालिमार भागात गेले होते. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिट लंपास केले. या पाकिटात काही रकमेसह एटीएम कार्ड व महत्वाचे कागदपत्र होते. दरम्यान चोरट्यांने शिवाजी गार्डन येथील बसेरा हॉटेल भागातील एटीएम मशिनमध्ये कार्डचा वापर करून ६५ हजाराची रोकड परस्पर काढून घेतल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.