नाशिक – मुंबईनाका,म्हसरूळ आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आठ जणांना शहर व जिह्यातून तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. चौकशीअंती महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा जणांना एक वर्षासाठी तर दोघा भावांना प्रत्येकी दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे रणजीत उर्फ स्वप्निल मारूती कांबळे, अरूण मारूती कांबळे (रा.दोघे राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टी),राकेश शिवाजी आहेर (रा.३३ बजरंगनगर,आनंदवली), अनिकेत विजय पगारे (२३ रा.शिवाजीनगर,गंगापूर) यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे अजय विठ्ठल घोडके (२५ रा.पंचवटी),रवि विठ्ठल घोडके (२७ रा.शिवाजीनगर),गोरख नागू आहिरे (१९ रा.मखमलाबाद) व अक्षय बाळासाहेब काकड (२६ रा.मखमलाबादरोड) यांना हद्दपार करण्यात आले आहे. वरिल कांबळे बंधूना दोन वर्ष तर उर्वरीतांना चौकशी अंती एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.