नाशिक – विशेष पोलीस महानिरीक्षक डॅा. बी.जी शेखर पाटील नाशिक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या परिसरातील कोपऱ्यातील चंदनाचे झाड चोरणा-या तस्कराला जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पकडून त्याला गजाआड केले. या चोराला नाशिक येथे आणण्यात आले आहे. नाशिकच्या तपास पथक आणि स्थानिक पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्याला पाठलाग करून भोकरदनला कोटरा बाजार या गावांमध्ये या चोराला पकडले. या चोराला पकडल्यानंतर गावातील चंदन तस्करीशी संबंधित असलेल्या गावकर्यांनी पोलिसांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला ,परंतु पोलिसांनी त्यांना बाजूला करून पकडलेल्या आरोपीला पोलिस स्टेशनला आणले.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १६ फेब्रुवारी रोजी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील नाशिक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या परिसरातील कोपऱ्यातील चंदनाचे झाड चोरीला गेले होते.आरोपींनी कंपाउंऊची भिंत चढून खाली उड्या टाकल्या आणि चंदनाच्या झाडाचा बॅटरीवरील करवतीने कापून त्यातील आतील गाभा चोरून नेला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनला चोरीचा व खाजगी आवारात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक हे सरकारी कामानिमित्त महत्वाच्या शासकीय बैठकीसाठी मुंबई येथे गेले होते. मुंबईवरून परत आल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक भद्रकाली व त्यांचीं डीबीची टीम तसेच क्राईम ब्रँच नाशिक यांची टीम, एलसीबी हेमंत पाटील व त्यांची टीम यांची तात्काळ डिटेक्शनवर मीटिंग घेतली. त्यांना या गुन्ह्या बद्दल बारकाईने मार्गदर्शन केले, डीसीपी बारकुंड क्राईम ब्रांचला त्यांनी तपासाचे काही महत्त्वाचे क्लू दिले. कोणत्या कुशलतेने अशा प्रकारचे गुन्हे चंदन चोरी उघडकीस आणण्याचा सूचना केल्या. त्यावेळी त्यांच्याकडे पोलिस आयुक्तनचा कार्यभार होता. तीन टीम करून वेगवेगळे कामगिरीवर पाठवण्यात आल्या, क्राईम ब्रँच युनिट दोनची टीम मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण क्लूवरून जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आले. जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख व लोकल पी आय भोकरदन व तपासणी पथकांची संपर्क साधण्यात आला, डॉ. शेखर पाटील यांनी स्वतः पोलीस अधीक्षक जालना भोकरदनच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना मदतीचे आवाहन केले.
त्यानंतर पीएसआय उगले व त्यांच्या टीमने भोकरदनला रात्री एक वाजता पोहचली.,IGp सरांशी संपर्क केला ,फोन वरूनच आरोपी पकडण्याची योजना ठरली व स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पहाटे पहाटे आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला, संशयित आरोपी याने कडी वाजलेले ऐकताच त्याला पोलिसांचा संशय आला व त्यांनी मागच्या दरवाज्यातून पलायन करून दुसऱ्या मजल्यावर गेला. तिथून नऊ ते दहा बिल्डींगवरून उड्या मारत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तपास पथक आणि स्थानिक पोलिस यांनी त्याचा पाठलाग रात्रीच्या अंधारात सुरू केला. मोठ्या कौशल्याने त्याला पाठलाग करून भोकरदनला कोटरा बाजार या गावांमध्ये पकडले ,गावच्या शिवारात पकडले , सतत विचारपूस करण्यात आली त्यास पकडल्यानंतर तेथील गावातील चंदन तस्करीशी संबंधित असलेल्या गावकर्यांनी पोलिसांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला व आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला ,परंतु पोलिसांनी त्यांना बाजूला करून पकडलेल्या आरोपीला पोलिस स्टेशनला आले , तेथून त्यास घेऊन आणि आज रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आरोपींनी कसा गुन्हा केला त्याबद्दल त्याला बारकाईने विचारपूस करून व त्या गुन्ह्यातील आरोपी व साथीदारांची यांची माहिती घेऊन आरोपीकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
या चोराने गुन्हा कबूल केला त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये घडलेले सातपूर, पोस्ट ऑफीस,जेलरचे निवास्थान व इतर ठिकाणचे सुमारे आठ ते नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. अतिशय प्रोफेशनल नैपुण्य असलेला सराईत गुन्हेगार जावेदखा पठाण हा शरीराने बलदंड आहे जालना वरून भोकरदन हा साथीदारांसह म्हणून मोटरसायकल आले. नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये राहिले आणि सरकारी बंगल्यांची निवासस्थानाचे रेकी करून त्यातील चंदनाचे झाड मोठ्या कौशल्याने व चोरून प्रवेशकरून चोरी करून मुलासह पलायन करत डॅा. शेखर पाटील यांनी पुढाकार घेऊन नाशिक क्राइम ब्रांच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यत सराईत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.