नाशिक – पाथर्डी फाटा उड्डाणपूलाच्या संरक्षक भिंतीवर परवानगी न घेता दोन्ही बाजूला बॅनर लावल्याने भाजप नगरसेवक राकेश दोंदे
यांच्यासह मेघराज शाम नलवे या दोघांवर गुन्हा दाखल झाला. शहरात पोलिस आयुक्तांनी विना परवानगी बॅनर लावण्यास प्रतिबंध केला आहे. असे असतांना भाजपचे नगरसेवक राकेश राजेंद्र दोंदे मेघराज शाम नवले यांनी काल रविवारी पाथर्डी फाटा उड्डाणपूलाच्या संरक्षक भिंतीवर बॅनर लावल्याने त्यांच्या विरोधात पोलिस शिपाई सचिन देवराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.