नाशिक – ओमनी कारच्या धडकेत जेल रोड भागातील एकाचा मृत्यु
नाशिक – ओमनी कारच्या धडकेत जेल रोड भागातील एकाचा मृत्यु झाला. नांदूर लिंक रोडवर शेवंता लॉन्स परिसरातहा अपघात झाला. भरत यशवंत खेलूकर (वय ५६, जागृतीनगर पंचक) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोशन खेलूकर यांच्या तक्रारीवरुन मनोज रमेश दहीतुले (वय ४२, राजूर ता.अकोले नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी (ता.१७) संशयित मनोज दहितुले त्यांच्या भरधाव ओमनी कार ने दुचाकी ला धडक दिल्याने त्यात भरत खेलूकर यांचे निधन झाले. आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
पेठ रोडला महिलेची सोनसाखळी ओरबडली
नाशिक – दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडल्या घटना पेठ रोडला किशोर सुर्यवंशी मार्गावर जुईनगर भागात घडली. रविवारी पावणे सातच्या सुमारास कमल किसन कांबळे रविवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास गणपतीचे दर्शन घेऊन घरी जात असतांना वैष्णवी ब्युटी पार्लर ते जुईनगर कॉर्नर या दरम्यान समोरुन दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत, दोन वाट्या असलेले गंठण ओबरडून नेले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.