नाशिक – सुभाष रोडला पैशासाठी एकावर कोयत्याने वार; कारची तोडफोड
नाशिक – सुमारास सुभाष रोडला भारती मठ भागात पैशाची मदत केली नाही म्हणून चौघांनी एकाच्या कारची तोडफोड करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सनी अरुण पगारे (वय ३१, सौभाग्यनगर, लॅम रोड) यांच्या तक्रारीवरुन चौघांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदेश वाघ, राकेश वाघ, रिचर्ड साळवे अशी संशयितांची नावे आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सुभाष रोडला भारती मठ भागात चौघांनी सनी याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याला नकार दिल्याने चौघांनी इनोव्हा (एमएच ०१ एएल ५५०) हिची तोडफोड करीत कोयत्याने वार केला. हवालदार एस.के.कोकाटे तपास करीत आहे.
नेपाळी कॉर्नर भागात एकावर वार
नाशिक – जुन्या वादातून एकावर वार करण्यात आल्याची घटना शालीमार चौकात नेपाळी कॉर्नर भागात घडली आहे. याप्रकरणी राहूल बाळासाहेब गांगुर्डे यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल शेलार (वय ३५, चांदशी ) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार राहूल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास काम आटोपून शालीमार चौकाकडे जात असतांना जुन्या भांडणातून कुणाल याने पाठीमागून येउन त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे
तक्रारीत म्हटले आहे.