नाशिक – कामटवाडे भागात रात्रीचा शिळा भात खाल्याने विषबाधा; ५० वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : रात्रीचा शिळा भात खाल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना कामटवाडे भागात घडली. अन्नातून विषबाधा झाल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लताबाई अशोक बोराडे (रा.मारूती मंदिराजवळ,कामटवाडे) असे मृत महिलेचे नाव आहे. लताबाई बोराडे यांनी शनिवारी (दि.१९) आपल्या राहत्या घरी रात्रीचा शिळा भात खाल्याने ही घटना घडली. अचानक उलट्या सुरू झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.
……….
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : सिडकोतील इंदिरागांधी वसाहत क्र.१ मध्ये राहणा-या एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हिरामण यशवंत गायकवाड असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. गायकवाड यांनी शनिवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या छताचे बांबुला वायर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी प्रकाश दांडेकर यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक दिनेश महाजन करीत आहेत.