नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीसह सास-यास अटक करण्यात आली आहे. पिकअप वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारिरीक छळ केल्याने विवाहीतेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सागर संपत उफाडे (२५) व संपत सर्जेराव उफाडे (४५ रा.नवलेचाळ,पाथर्डीफाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दौलत उत्तम थोरात (रा.बोरगाव खु.जि.जालना) यांनी तक्रार दाखल केली आहे. भाग्यश्री सागर उफाडे या विवाहीतेने नुकतीच आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पिकअप घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी तिचा छळ केला जात होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्या आरोप केला असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.