नाशिक – बंद वर्कशॉप फोडून चोरट्यांनी सुमारे ७७ हजार रूपयाचा ऐवज चोरीला
नाशिक : बंद वर्कशॉप फोडून चोरट्यांनी सुमारे ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात वेगवेगळया प्रकारच्या मटेरियल आणि मशिनरीचा समावेश असून, ही चोरी शेडचे स्कू खोलून करण्यात आली आहे. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंगेझ सर्फराज खान (रा.वाडिव-हे फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान यांचा प्रबुध्द नगर येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या मेन गेट भागात सी.एस.इंजिनिअरींग नावाचा वर्कशॉप आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडचे स्क्रू खोलून वर्कशॉप मध्ये प्रवेश केला व कारखान्यातील डॉग चक,टू चक,थ्री जॉक,ड्रिल,स्टेडीरेस्ट,टूलींग मटेरियल असा सुमारे ७७ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
३० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक : देवळाली कॅम्प येथील कॅथे कॉलनीत राहणा-या ३० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राहूल रमेश क्षीरसागर असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. क्षीरसागर यांनी गुरूवारी (दि.१७) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पत्नी मनिषा क्षीरसागर यांनी त्यांना तातडीने कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.
……..