नाशिक – टकलेनगर भागात अल्पवयीन मुलांच्या चेष्टामस्करीत तीन जणाने एकाचे तीन दात पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघांनी दोघा मित्रांना बेदम मारहाण केली आहे.
या घटनेनंतर साहिल सेवक निखात (१६ रा.कृष्णनगर,पंचवटी) या युवकाने पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. साहिल निखाते, आदित्य भालेराव व समर्थ भालेराव हे तिघे मित्र मंगळवारी दुपारच्या सुमारास टकलेनगर येथील जिजामाता व्यायाम शाळा गार्डनमध्ये गेले होते. सावलीत बसण्यासाठी ते एका झाडाच्या दिशेने जात असतांना वाटेत त्यांना प्रमोद क्षिरसागर हा परिचीत भेटला. या भेटीदरम्यान तिघा मित्रांनी त्याची चेष्टा केली असता ही घटना घडली. संतप्त क्षिरसागर याने अन्य दोन मित्रांना बोलावून घेत चेष्टामस्करीचा जाब विचारत तिघा मित्रांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत साहिलचे तीन दात पडले असून संशयीतांनी जातांना आमच्या नादी लागले तर तुम्हाला पाहून घेवू असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.