नाशिक – स्वारबाबानगर येथे जिन्यावरून पाय घसरून पडल्याने तरूणाचा मृत्यु
नाशिक : स्वारबाबानगर येथे जिन्यावरून पाय घसरून पडल्याने ३६ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुभाष दगडू साबळे (रा.लोंढे सभागृहाजवळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. साबळे हे मंगळवारी रात्री आपल्या घरातील पाय-या उतरत असतांना अचानक पाय घसरून पडला होता. या घटनेत त्याच्या नाका – तोंडासह डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
……..
नाशिक – उपनगरमध्ये दुचाकीवरून चक्कर येवून पडल्याने ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु
नाशिक – दुचाकीवरून चक्कर येवून पडल्याने ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. भाईदास तुकाराम पाटील (रा.सय्यद पिंप्री) असे मृत इसमाचे नाव आहे. मंगळवारी दुचाकीवर प्रवास करीत असतांना अचानक चक्कर येवून रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी धाव घेत त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. पण, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. डॉ. देवरे यांनी खबर दिल्याने याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहे.