नाशिक : अल्पवयीन मुलीचे सराईत गुन्हेगाराने अपहरण केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताने मुलीस फुस लावून पळवून नेल्याचा कुटूंबियांनी संशय व्यक्त केला आहे. गौरव सोनवणे उर्फ चुआ (रा.फुलेनगर,पेठरोड) असे मुलीस पळवून नेणा-या संशयीताचे नाव असून त्याच्याविरूध्द खूनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नवजीवन हॉस्पिटल भागातून संशयीताने मुलीस पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून फुस लावून त्याने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.