नाशिक औदयोगीक वसाहत भागात मद्यसेवन करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कोयत्याने हल्ला
नाशिक : औदयोगीक वसाहतीतील व्हिक्टर पॉईंट भागात मद्यसेवन करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने परिचीत त्रिकुटाने एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी साळवे,सोन्या व परश्या अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी खंडू सुखदेव वाघ (३९ रा.आंबेडकर पुतळ््याजवळ,महादेववाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाघ बुधवारीरात्री व्हिक्टर पॉईंट भागात गेले होते. परिचीत असलेल्या संशयीतांनी त्यास संतोष काळे यांच्या हॉटेल समोर गाठून मारहाण करीत कोयत्याने हल्ला केला. दारू सेवन करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयीतांनी शिवीगाळ करीत वाघ यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने लोखंडी कोयता डोक्यात मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
नाशिक – गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक – हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडून या संशयितांनी परिसरात लोकांना दमबाजी केली होती. या संशयितांमध्ये एक जण अल्पवयीन आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून सिडको परिसरातली गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.