नाशिक : इरटिका कार भाडेतत्वावर घेवून मालकांना दरमहा ठरलेले भाडे न देताच मुंबईस्थित एकाने वाहन पळवल्याची घटना घडली आहे. संशयीतांनी अॅडव्हान्स म्हणून प्रती वाहन ५५ हजार रूपये देण्याचे ठरलेले असतांनाही सदरची रक्कम न देता गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा श्रीधर वाढेकर (४३ रा.संभीजी स्टेडिअम मागे,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी या घटनेची माहिती दिली आहे. मुंबईतील मालवाणी बस डेपो भागात राहणा-या ३६ वर्षीय भामट्याने कॉजेलरोड भागातील नेक्सस पॉईंट या इमारतीच्या तीस-या मजल्यावर ग्लोबल एन्टरप्रायझेस या नावाने कार्यालय थाटले होते. अनेक ट्रव्हल्स कंपनींचे वाहणे संशयीताकडून वापरली जात असल्याने शारदा वाढेकर आणि जालिंदर भानुदास वाडेकर यांनी संबधीत कार्यालय प्रमुखाची भेट घेतली होती. तक्रारदारांच्या दोन इरटिका कार एमएच १५ जीएल १०९६ व एमएच १५ इए ९४८७ प्रत्येकी दरमहा ५५ हजार या प्रमाणे भाडेतत्वावर लावण्याचे ठरल्याने १ फेब्रुवारी रोजी याबाबत करारनामा करून वाहणे संशयीतांच्या स्वाधिन करण्यात आली होती. मात्र संशयीतांनी अॅडव्हान्स म्हणून प्रती वाहन ५५ हजार रूपये देण्याचे ठरलेले असतांनाही सदरची रक्कम न देता गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी करीत आहेत.