नाशिकरोडला चेहेडी शिवारात दारणा नदीत बुडून युवकाचा मृत्यु
नाशिक – नाशिकरोडला चेहेडी शिवारात दारणा नदीत बुडून युवकाचा मृत्यु झाला. रविंद्र उर्फ बापु साहेबराव तिडके (वय २३,चेहेडी पंपीग) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. काल बुधवारी (दि.९) दुपारी पावणे चारच्या सुमारास चेहेडी जून्या पुलाखाली दारणा नदीपात्रात उडी मारल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. धनंजय हांडगे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्या माहीतीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – नाशिक रोडला जय भवानी मार्गावर जेतवननगरला बाथरुममध्ये गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. गणपत शाहू गांगुर्डे (वय ७५, जेतवननगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काल बुधवारी (दि.९) दुपारी सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बाथरुममध्ये लोखंडी ॲगगला नायलॉन दोरीने गळफास आत्महत्या केल्याचे विक्रम यशवंत पगारे यांच्या माहीतीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भाजलेल्या वृध्देचे उपचार दरम्यान निधन
नाशिक – घरात शेकत असतांना भाजलेल्या वृध्देचे बुधवारी (दि९) जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ताराबाई पुरुषोत्तम जोशी (वय ९५, निलगीरी बाग) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपूवी घरात शेकोटी करुन त्या शेकत असतांना लुगड्याचा पदर पेटल्याने त्या भाजल्या उपचारासाठी त्यांना
जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. तडवी यांनी मृत घोषीत केले. आडगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक – मेन रोडला आरती डिस्ट्रीब्युटर्स दुकानासमोरुन जात असतांना चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यु झाला. रविनारायण रामशिरोमणी पंडे (वय ५०, संजीवनीनगर, अंबड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (दि.९) दुपारी मेन रोडहून ते पायी जात असतांना चक्कर येऊन पडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉ. तडवी यांनी मृत घोषीत केले. भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.