नाशिक – फोरच्युनर कारची एकाने परस्पर विल्हेवाट लावणा-या विरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेरगावी जाण्यासाठी ताब्यात घेतलेली गाडी दोन महिने उलटूनही वाहन ताब्यात न दिल्याने तसेच गाडीच्या माध्यमातून गैरमार्गाचे काम केल्याचा संशयातून हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी भारत महेश साळुंखे (३१ रा.एश्वर्या हाईटस,त्रिमुर्तीचौक) असे कारची विल्हेवाट लावणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सतिश रामनाथ भुसे (३४ रा.सत्यम हिल्स,शरयू पार्क जत्रा हॉटेल) यांनी तक्रार दाखल केली आहे. साळुंखे आणि भुसे यांचे घरोब्याचे संबध आहेत. त्यातून भुसे यांची कार एमएच १५ जीई ५३५३ अधून मधून साळुंखे घेवून जात होता. गेल्या ३ ऑगष्ट रोजी संशयीताने भुसे यांचे घर गाठून व्यवसायात मोठा तोटा झाल्याची बतावणी करीत जम्मू काश्मिर येथे जाण्यासाठी कार नेली ती अद्याप परत केली नाही. दोन महिने उलटूनही कार परत न केल्याने भुसे यांनी विचारणा केली असता संशयीताने टाळाटाळ करीत उडवा उडवीचे उत्तरे दिली. वाहनातून गैरमार्गाने काही तरी वाहतूक केल्याचा संशय बळावल्याने भुसे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.