नाशिक – मालकाच्या घराची कडी उघडून दोघा नोकरांनी लंपास केले ८० हजार
नाशिक – ठाकरेरोडवरील पिंपळचौकात मालकाच्या घराची कडी उघडून दोघा नोकरांनी ८० हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सानू मोहम्मद बिलाणी (रा.अलीगड,उत्तरप्रदेश) व मोहसिन शेख (रा.पंचशील नगर,गंजमाळ) अशी संशयीत नोकरांची नावे आहेत. याप्रकरणी शहनवाज हाजी सुलेमान कुरेशी (रा.उत्तरप्रदेश हल्ली,पिंपळचौक ठाकरेरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुरेशी इलेक्ट्रीक वस्तूची हात विक्री करतात. संशयीत त्यांचे नोकर असून गेल्या सोमवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास ते होम थिएटर आणि गॅस शेगडी विक्री करण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. दोघा नोकरांनी मालक घरात नसल्याची संधी साधून घराची कडी उघडत लेदर बॅग मधील व्यवसायाची सुमारे ८० हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
नाशिक – भिमवाडी भागात चोरट्यांनी रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ४४ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक – भिमवाडी भागात चोरट्यांनी रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ४४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजा जावेद खान (२३ रा.भारतनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान या भिमवाडी परिसरातील गंजमाळ पोलीस चौकीच्या मागे आपल्या आई समवेत राहतात. बुधवारी सकाळच्या सुमारास त्या घरात आंघोळ करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी लोटलेले दार उघडून घरात प्रवेश केला व हॉलमधील पलंगावरील गादी खाली ठेवलेली १४ हजाराची रोकड आणि सोन्याची पोत असा सुमारे ४४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.