नाशिक : अमृतधाम परिसरातील घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी २ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल जव्हेरीलाल जैन (रा.रूख्मीनी हाईटस,गोपालनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,सोमवारी दुपारच्या सुमारास जैन कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे २ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.