नाशिक – वडाळा रोड वरील रेहणूमा शाळा भागात मुलास शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा एकाने पाठलाग करीत विनयभंग केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित देविदास महादेव कोळी (२५ रा.भारतनगर) याला पोलिसांनी गजाआड केले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार सोमवारी दुपारी पीडित मुलास शाळेत सोडण्यासाठी गेली होती. वडाळारोङ वरील रेहणूमा शाळा भागात उभ्या असलेल्या संशयिताने अश्लील हावभाव केले. महिलेने दुर्लक्ष केले असता संशयिताने पाठलाग करून रस्ता अडवित माझ्या मोटार सायकलवर चल असे म्हणत विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत