नाशिक – औरंगाबाद रोडवरील स्वामी नारायण नगर भागात कुरिअरचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबरार मुजफ्फर खान ( रा. वडाळारोङ) यानी तक्रार दाखल केली आहे. खान याचे स्वामी नारायण नगर येथील नक्षत्र बिल्डिंग मधे डिलिव्हर लिमिटेड नावाचे कुरिअरचे कार्यालय आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी बंद कार्यालयाचे शटर उचकटून गल्यातील रोकड,कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा असा सुमारे एक लाख ५६ हजार ७४० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.