दुचाकीस्वार महिलेला धक्काबुक्की, सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वार महिलेचा कारचालकाने विनयभंग केल्याची घटना त्र्यंबकरोडवरील कुबेर पेट्रोल पंपा समोर घडली. पायावरून चाक जाईल असे म्हटल्याने संशयीत कारचालकाने दमदाटी व धक्काबुक्की करीत महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दुचाकीस्वार पीडिता बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास अॅक्टीव्हा दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. कुबेर पेट्रोल पंपासमोरील रस्ता ओलांडत असतांना ती आपल्या दुचाकी दुभाजकाजवळ थांबवून उभी असतांना इको फोर्ड कार एमएच १५ एजे २७२२ जवळ येवून थांबली. कार दुचाकीस चिटकून उभी राहिल्याने महिलेने चालकास पायावरून चाक जाईल असे म्हटल्याने हा वाद झाला. यावेळी संतप्त चालकाने शिवीगाळ करीत आपले वाहन दुचाकीस आडवे लावले व खाली उतरूण महिलेशी धक्काबुक्की करीत मारहाण केली. यावेळी महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधत बोलावून घेतले असता त्यांनाही संशयीताने शिवीगाळ करीत व बघून घेईन अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
….