नाशिक – बडदेनगर येथील नानानानी पार्क लगतच्या चहाच्या टपरीवरुन सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारण सुरु असतांना शिवीगाळ करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे संतापलेल्या दोघांनी एकाला बेदम मारहणा केली. शुक्रवारी दुपारी चारला ही घटना घडली आहे. या मारहाणीतत धारधार हत्याराचा सुध्दा वापर करण्यात आला आहे. निखील अर्जुन विंचू (वय २३,राजापूर येवला) यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी निखील विंचू हा चहाच्या टपरीवर चहा पीतांना इन्स्ट्राग्रामवर लाईव्ह असतांना याच दरम्यान त्याला फ्रेंड रिक्वेस्ट आली ती स्विकारली असतांना तिकडून व्हिडीओ कॉलवर सुयश कश्मिरे हा शिवीगाळ करु लागला. त्यामुळे त्याने फोन बंद करीत शिवीगाळ का करतो असे विचारल्याने संशयित कश्मीरे याने व त्याच्यासोबत आलेल्या दोघांनी बेदम मारहाण करीत बरगडीवर धारदार हत्याराने वार केला.