नाशिक – जलाराम धाबा परिसरात पुलावरून नाल्यात उडी घेत एकाने केली आत्महत्या
नाशिक – पेठ रोड वरील जलाराम धाबा परिसरात पुलावरून नाल्यात उडी घेत एकाने आत्महत्या केली. आत्महत्या करणा-याची अद्याप ओळख पटलेली नाही. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आत्महत्या करणा-याने पूलावरुन उडी मारली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकानी घटनेची माहिती पोलीस कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलिस नाईक निकम यांनी धाव घेत रात्री साडे दहाला जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचाराला दाखल केले असता, त्याच्यावर उपचार सुरु असतांना डॉ. भुसारे यांनी मृत घोषीत केले.
रिक्षासह एकदुचाकी चोरीला
नाशिक – शहरात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागात रिक्षासह एकदुचाकी चोरुन नेल्याचे उघडकीस आले.गंगापूर रोडवर जोशी वाडा भागातील शिवाजी सुर्यवंशी (वय ३२, जोशीवाडा) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे स्विकार यांनी त्यांची रिक्षा (एमएच १५ झेड ८४६७) ही १२ जानेवारीला लुथरा बंगल्यासमोरील केकान रुग्णालयाच्या बाजूला पार्किंगमध्ये लावली असता चोरट्याने रिक्षा चोरुन नेली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत निलेश सुधाकर वाणी (वय ३४, पवननगर) यांची हिंरो होंडा शाईन (एमएच १५ जीएच २८०२) हि दुचाकी ठक्कर बाजार येथील पार्किंगमध्ये लावली असता चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.