नाशिक – काकाने पुतण्याच्या घरातील रोकडसह दागिणे केले लंपास; काकास पोलीसांनी केले गजाआड
नाशिक – काकाने पुतण्याच्या घरातील रोकडसह दागिणे लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत काकास पोलीसांनी गजाआड केले आहे. सागर रघुनाथ ठाकरे (३४ रा.ओमनगर,धुळे) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीताने बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रावरचे लॉक तोडून सोन्याचांदीचे दागिणे आणि रोकड असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही बाब निदर्शनास येताच योगेश्वर शशिकांत ठाकरे (रा.एलआयजी सोसा.शिवाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. योगेश्वर ठाकरे यांचे संशयीत चुलत काका असून तो पाहूणा म्हणून योगेश्वर ठाकरे यांच्याकडे आला होता. ठाकरे दांम्पत्य गेल्या शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
चक्कर येवून पडल्याने ६७ वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : भाजीपाला खरेदी करीत असतांना चक्कर येवून पडल्याने ६७ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना सराफ बाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विमल एकनाथ निचळ (रा.गोळे कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. निचळ या शुक्रवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी सराफ बाजार भागात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. टकले बंधू या सराफी पेढी समोर अचानक चक्कर आल्याने त्या पडल्या होत्या. नागरीकांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक माळोदे करीत आहेत.