नाशिक : उत्तरानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाच्या ऐवज चोरुन नेला आहे. किशन जयवंत भामरे (२९ रा.शुभ रो हाऊस,उत्तरानगर गार्डनच्या बाजूला,लेन नं२ उपनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भामरे कुटूंबिय गेल्या रविवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. या चोरीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह दोन मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या किचनच्या दरवाजाची कडी तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सुमारे २ लाख २६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे आणि दोन मोबाईल चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक एस.बी.पाटील करीत आहेत.