नाशिक – सहा महिन्यासाठी हद्दपार केलेल्या सराईताने महिलेला केली मारहाण; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
नाशिक – पोलिसांनी सहा महिन्यासाठी हद्दपार केलेल्या सराईताने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सागर प्रकाश कांबळे (गोदरेजवाडी सिन्नरफाटा) असे सराईताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याला गुरुवारी (ता.२०) ला सहा महिन्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे. असे असतांना मंगळवारी (ता.२५) त्याने गोजरेजवाडी भागात भांडण सोडवत असलेल्या सविता जोपुळकर या महिलेला भांडण का सोडवते असे म्हणत बुटाने मारहाण केली. त्यानंतर तिच्या पतीने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घरातून चार मोबाईल चोरीला
नाशिक – पाथर्डी फाटा भागात दामोधर चौकात बंद घरात घुसून चोरट्यांनी चार मोबाईल चोरले. याप्रकरणी शुभम राजेंद्र शेळके (वय २४, संविधान भवन दामोधर चौक) यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी मंगळवारी (ता.२५) तक्र्रारदार शुभम शेळके व त्यांचे सहकारी मित्र त्यांच्या बंद घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी मागील दरवाजाची जाळी तोडून घराची कडी अघडून घरातील चार मोबाईल चोरुन नेले.
महिलेची आत्महत्या
नाशिक – वडाळा शिवारात भारतनगरला विष घेतल्याने महिलेचा मृत्यु झाला. शबनम रिझवान खान (वय २१, मज्जीत गल्ली, भारतनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. काल बुधवारी (ता.२६) अकराच्या सुमारास राहत्या घऱी विष घेत्याने तिला त्रास होउ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भुसारे यांनी मृत घोषीत केले.