युवतीचा विनयभंग
नाशिक – युवतीचा वारंवार पाठलाग करून विनयभंग करत २० हजार रूपये न दिल्यास बदनामी करण्याची धमकी देणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम शेख (२०, रा. बजरंगवाडी, सिद्धार्थ होॅटलेजवळ, मुंबईनाका) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित हा ४ मे पासून आतापर्यंत सतत पीडितेचा पाठलाग करून तीचा विनयभंग करत आहे. २० हजार रूपये न दिल्यास सर्वत्र बदनामी करेल अशी धमकी दिली यावरून त्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक अंकुश जाधव करत आहेत.
…..
सातपूरला अवैध मद्य विक्रीवर छापा
नाशिक – प्रबुद्धनगर येथे अवैध मद्य विक्री करणार्या अड्ड्यावर छापा टाकत सातपूर पोलीसांनी साडेचार हजाराचा मद्यसाठा जप्त केला तसेच विक्री करणार्या एकास अटक केली. पोपट शंकर खाडे (४६, महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रबुद्धनगर येथे दगडी भिंतीजवळ मद्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या ७० बाटल्या जप्त केल्या. याप्र्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…