मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई आग्रारोडने म्हसोबा महाराज मंदिराचे पुढे बोलरो पिकअप नंबर एम.एच. 04/ एच.डी. 1458 हिचेमधुन इसहाक खान ईस्माईल खान पठाण रा.शेंदुर्णी ,जामनेर जि. जळगाव व त्यांचा साथीदार इरफान जुम्मा पठाण हे वांगे भरुन कल्याणकडे जात असतांना योगेश रविंद्र उर्फ विश्वास वाघ (२३ )रा. तिसगाव ता.देवळा व त्याचे दोन जोडीदारांनी दुचाकीवर येऊन सदरच्या पीकअप बोलेरोची पुढील काच दगड मारुन फोडली इसहाक खान व इरफान खान पठाण यांचे शर्टचे वरच्या खिशांत ठेवलेले सॅमसंग कंपनीचा दोन हजार रुपये किंमतीचा भ्रमणध्वनी व पाचशे रुपये रोख जबरीने काढून जबरीची चोरी केल्याची फिर्याद इसहाक खान यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश बी.चौधरी व हवालदार दीपक मोरे यांनी तपास करुन योगेश रविंद्र उर्फ विश्वास वाघ यास ताब्यात घेतले तर उर्वरीत दोन जोडीदारांचा तपास पोलीस करीत आहेत.