नाशिक – पंचवटीतील सितागुंफा जवळ चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी
नाशिक – पंचवटीतील सितागुंफा जवळी उद्यानात चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ललित विजय राउत (वय ४०, सितागुंफा पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका येथील कृष्णनगर भागातील उद्यानातील सहा इंच व्यास आणि आठ इंच लांबीचा चंदनाचे झाड चोरट्याने चोरुन नेले. शुक्रवारी (दि.२१) सकाळी नऊला झाड तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरफोडीत ३५ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक – सिडकोत बडदेनगरला घरफोडीत करीत चोरट्यांनी सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी विलामबिल बाबा गोविद (वय ८०, शांतीसागर पार्क, पांगरेनगर सिडको ) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी चोरट्यांनी शांतीसागर पार्क मधील संशयिताच्या घराच्या लोखंडी दरवाजाच्या फटीतून हात घालून घरात प्रवेश करीत चार्जिंगला लावलेला मोबाईल पैशाचे पाकीट, बॅ’कांचे एटीएम कार्ड असा सुमारे ३५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.