नाशिक – रविवार कारंजा भागात सीसीटीव्ही काढण्यावरुन वाद; एकाला दोघांकडून बेदम मारहाण
नाशिक – रविवार कारंजा भागात सीसीटीव्ही काढावेत यासाठी दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. बंटी अनिल नवले आणि जयंत ढाकणे अशी संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि.२१) रात्री साडे नऊला गोरेराम लेन भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेली माहीती अशी दोघा संशयितांनी बाबाराव तात्याराम पुंजारे (वय ४५, उमामहेश्वर वाडा) यांना गोरेराम लेन भागात बोलावून नेले व उमामहेश्वर वाड्यात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून घेण्यास सांगितले मात्र बाबाराव यांनी त्यास नकार दिल्याने दोघा संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक – संर्पक कार्यालय सुरु केले म्हणून बेदम मारहाण
नाशिक – संर्पक कार्यालय सुरु केले म्हणून चौघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटा भागातील माऊली नगर येथे घडली. मिलींद (आप्पा) गायकवाड, गनाजी माळी व इतर दोघे अशी संशयिताची नावे आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी तक्ररादार अनुराग हरिष जाधव (वय २८, तुळजा भवानी रोड माउलीनगर) यांनी परिसरात सामाजिक कामासाठी स्वताचे संर्पक कार्यालय सुरु केले आहे. त्याचा राग आल्याने गुरुवारी (दि.२०) पावने दहाच्या सुमारास चौघा संशयितांनी संर्पक कार्यालयाच्या शटरला लाथा मारुन तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून तक्रारदाराला लाथा बुक्यांनी मारहाण केली.याप्रकरणी चौघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.