दुधाचे पैसे मागितल्याने तलावरीने मारहाण
नाशिक – ढाब्यावर दुधाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघा वयोवृद्ध भावांनी दोघांना तलवार तसेच लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार मुंबई – अग्रा महामार्गावर आडगाव शिवारातील महाराष्ट्र ढाबा येथे मंगळवारी (दि.२५) घडली. अजिंतसिंग गुलजारसिंग मेहेल (६०), हरजिंदर गुलजारसिंग मेहेल (६४, रा.गायकवाडनगर, मुंबईनाका) व गजानन लीलाधर तायडे (३६, रा. हॉटेल पंजाब ढाबा) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अंजनीकुमार लालताप्रसाद ओझा (४१, रा. ओमनिवास सोसायटी, जत्रा हॉटेल रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ढाब्यावर दिलेल्या दुधाचे पैसे ओझा यांनी मागितल्याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना तलवार तसेच लाठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नरवडे करत आहेत.
….