नाशिक – क्रेडीट कार्डाची आर्थिक मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने भामट्याने एकाला सुमारे सव्वा लाखाला गंडविले. याप्रकरणी मानवेंद्रप्रताप उमेशकुमार सिंग (२५, नारी गोल्ड अपार्टमेंट वजन काट्यामागे अंबड) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार मानवेंद्र सिंग यांना ६ ऑगस्टला ७८७३५०२४५६ आणि ७७७०९१०८३७ या मोबाईलवरुन फोन आला त्यावरील भामट्याने आरबीएल बॅकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे क्रेडीट कार्ड बंद करीत असल्याचे सांगून या कार्डातील लिमीट दुसऱ्या कार्डात ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने स्टेट बॅकेच्या कार्डाची माहीती घेतली तसेच त्यासाठी चार वेळा ओटीपी मागवून घेत, संशयिताच्या खात्यातील १ लाख ३० हजार ऑनलाईन खर्च करुन फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.