खिडकीतून सोन्याची चेन. मोबाईल लंपास
नाशिक – घराच्या उघड्या खिडकीतून हात घालत चोरट्याने ४२ हजाराची सोन्याची चेन व ५ हजाराचा मोबाईल असा ४७ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२४) म्हसरूळ परिसरात घडली.याप्रकरणी ज्योती भुषण गोसावी (रा. केतकीनगर, म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री गोसावी कुटुंबिय झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीतून हात आत घालून जवळील सोन्याची चेन व मोबाईन चोरुन नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पवार करत आहेत.
….