नाशिक : त्र्यंबकरोडवरील सत्या कॉलनीत पती व सासूने डॉक्टर पत्नीस लाकडी बॅटने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत डॅाक्टर महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी डॉ.नॅन्सी पारख यांनी तक्रार दाखल केली आहे. विशाल पारख व आशा पारख अशी विवाहीतेस मारहाण करणा-या संशयीत पती व सासूचे नाव आहे. डॉ.पारख या सोमवारी आपल्या मुलास शिकवणीला सोडण्यासाठी गेली असता ही घटना घडली. घरी परतल्यानंतर विनाकारण पती आणि सासूने शिवीगाळ करीत महिलेस मारहाण केली. या घटनेत लाकडी बॅटचा वापर करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.