नाशिक – हिरावाडीतील कोळीवाडा भागात शेकोटीवर शेकत असतांना भाजल्याने ३६ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. संतोष प्रभाकर डंबाळे ( ३६, रा. वाल्मीक आंबेडकर आवाज योजना कोळीवाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. डंबाळे दांम्पत्य रविवार आपल्या घरासमोर शेकोटी पेटवून शेकत असतांना ही घटना घडली. अंगावर पांघरलेल्या गोधडीने अचान पेट घेतल्याने डंबाळे गंभीर भाजले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता औषधोपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.