जीवे मारण्याचा प्रयत्न १० जणांवर गुन्हा
नाशिकः जुन्या भांडणाच्या कारणातून १० जणांच्या टोळक्याने दोघा भावांवर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२३) रात्री गंजमाळ परिसरात घडली. या प्रकरणी दहा जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रत्यन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन हिवाळे, संदिप दाढेकर, सचिन गायकवाड, गणेश मोरे, आझाद पाथरे, अनुराग सहेजराव, रोहित डोके व त्यांचे तीन साथीदार अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रईस कुरशिद शेख (४२, रा. गंजमाळ, भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित शेख यांच्या दरात येऊन जुन्या भांडणाची कुरापत काढून शेख व त्यांच्या भावास बेदम मारहाण सुरू केली. यात दोघांनी चाकू काढून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक माळी करत आहेत.
….