नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघा अजय साळवे (रा.साईबाबा मंदिर समोर, पोकार काॅलनी) यानी याबाबत तक्रार दाखल केली आहे. साळवे या मंगळवारी सायंकाळी कलानगर लेन २ कडून कॅालनी रोडने आपल्या घराच्या दिशेने पायी जात असताना ही घटना घडली. समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा पैकी एकाने त्याच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे गंठण ओरबाडून नेली.अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.