नाशिक : तरूणीचा विवाह ठरल्याचे समजल्यानंतर माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत, सासरच्या मंडळीस प्रेमप्रकरण सांगून बदनामी करेन अशी धमकी देत खंडणी उकळणा-या सराईत गुन्हेगाराविरुध्द विनयभंगासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सराईत गुन्हेगाराने युवतीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला. संशायीत गेल्या २१ मे पासून पीडितेस ब्लॅकमेल करीत असून घरी जावून तो तरूणीस धमकावित पैसे उकळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना साईनाथनगर भागात घडली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात झाला असून संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. मुज्जफर जहूर भुरे (४० रा.मनोहर मार्केट,सारडा सर्कल) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर फसवणुकीसह जबरीचोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी साईनाथ नगर भागात राहणा-या पीडित तरूणीने तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत