नाशिक : हिरावाडीत बांधकाम साईट वरील गोण्या फेकण्याच्या वादातून पीडित महिलेच्या आईस शिवीगाळ व दमदाटी व भावास मारहाण केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशिमबंध लॉन्स पाठीमागे आत्रेय अंगन नावाची बांधकाम साईट सुरू असून, रविवारी या साईटवरील कामगारांनी इमारतीवरून वाळूच्या गोणी खाली फेकल्याने हा वाद झाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन रोहित काठे,जयेश काठे व खोडे यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेजारी राहणा-या पीडितेच्या घरात धुळ गेल्याने तिची आई समजावून सांगण्यास गेली असता संशयीतांनी तिला शिवीगाळ केली. यावेळी तिचा भाऊ आपल्या आईच्या मदतीला गेला असता त्यास दमदाटी करीत संशयीतांनी मारहाण केली. तसेच मायलेकांना शिवीगाळ होत असल्याचे बघून पीडिता धावून गेली असता रोहित काठे याने पीडितेचा हात पिरगळून तू कोण आली आम्हास समजवून सांगणारी तूला नव-याने टाकून दिले असून तुला नवरा सांभाळता आला नाही आता दुसरा ठेवला असे म्हणून शिवीगाळ केली. तर जयेश काठे याने मायलेकांना अश्लिल शिवीगाळ करीत पिडीतेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.