नाशिक – नाशिकच्या गुन्हेशाखेने बेकायदशीररित्या तलवार बाळगणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल शेळके असे या तरुणांचे नाव आहे. पंचवटी परिसरात गस्तीवर असताना पोलीस अंमलदार रविंद्र बागुल यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. कुमावत नगर, पंचवटी येथे राहणा-या राहुल शेळके याने बेकायदेशीररित्या एक तलवार आणलेली होती. ती तलवार राहत्या घरात लपवून ठेवली होती. त्यानंतर हे पथक पंचवटी मधील कुमावत नगर येथे गेले असता बेकायदेशीररित्या तलवार बाळगणारा राहुल शेळके यास ताब्यात घेतले.