बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – फळविक्रेत्यांना बेदम मारहाण, लाठ्या काठ्यांसह कोयत्याचा वापर

by India Darpan
एप्रिल 19, 2021 | 10:02 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


फळविक्रेत्यांना त्रिकुटाकडून मारहाण
नाशिक : वाहनाचे नुकसान करून त्रिकुटाने फळविक्रेत्यांना बेदम मारहाण केल्याची घटना गोरेवाडी भागात घडली. या मारहाणीत संशयीतांनी लाठ्या काठ्यांसह कोयत्याचा वापर केल्याने फळविक्रेते जखमी झाले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम बेनवाल,राहूल उज्जेनवाल,सलमान शेख असे फळ विक्रेत्यांना मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी नितीन हनुमंत उद्दीनकर (रा.जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. उद्दीनकर व त्याचे मित्र नितीन कुसाळकर आणि रोशन कुसाळकर हे तिघे रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास गोरेवाडीतील रेल्वे गेटच्या पुढे व रिक्षा थांबा भागात ओमनी कारमधील टरबूज विक्री करीत असतांना ही घटना घडली. संशयीतांनी तिघा मित्रांना गाठून जेलरोड हा आमचा एरिया आहे. तुम्ही आमच्या एरियात टरबूज विक्री करायला का आलेत अशी कुरापत काढून शिवीगाळ केली. या वेळी संतप्त त्रिकुटाने तिघा फळविक्रेत्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तिघांवर कोयत्याने वार केल्याने फलविक्रेते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

…..

धोंगडे मळयातील घरफोडीत रोकड चोरी
नाशिक : बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील साडीमध्ये ठेवलेली २५ हजाराची रोकड चोरून नेली. ही घटना नाशिकरोड परिसरातील धोंगडेमळा भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक त्रिभुवनदत्त शर्मा (रा.स्नेहबंधन कॉलनी,धोंगडेमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा कुटूंबिय बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. शनिवारी (दि.१७) रात्री अज्ञात चोरट्यांनी शर्मा यांच्या भावाच्या बंद बंगल्याचे कडी कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून साडी खाली ठेवलेली रोकड व साडी चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.

….

गच्चीवरून पडल्याने वृध्दाचा मृत्यु
नाशिक : गच्चीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ७६ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. ही घटना देवळीली कॅम्प भागात घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रमेश रामचंद्र कटारे (रा.देवळाली कॅम्प) असे मृत वृध्दाचे नाव आहे. कटारे गेल्या बुधवारी (दि.१४) आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर झोपलेले होते. अचानक ते जमिनीवर कोसळल्याने कुटूंबियांच्या ही घटना निदर्शनास आली. कटारे यांना तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ घोटी येथील एसएमबीटी रूग्णालयात दाखल केले असता रविवारी त्यांचा मृत्यु झाला. वाडिव-हे पोलीसांनी या मृत्युची नोंद देवळाली कॅम्प पोलीसांकडे वर्ग केली असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी ७८ बॉक्स लांबविले

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता नवे अभियान ‘#महाराष्ट्रद्रोही_कमळमळ’; काय आहे हे?

Next Post
ncp

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता नवे अभियान '#महाराष्ट्रद्रोही_कमळमळ'; काय आहे हे?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011