नाशिक – वाहतूक पोलिसांच्या भरारी पथकाने शहरातील नम्रता पेट्रोलपंप मालकाविरुद्ध कारवाई केली आहे. हेल्मेट वापरासंबंधीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पेट्रोल पंप मालकाविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ (ब) (१) अन्वये ही कारवाई करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल दिल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेच्या युनिट तीनच्या भरारी पथकाच्या सहायक निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांनी ही कारवाई केली. पेट्रोल पंपावर आलेल्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसताना त्यांना पेट्रोल देऊ नये असे आदेश असतांना अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोल दिले जाते. आता पोलिसांनी कडक पाऊले उचलत कारवाईला सुरुवात केल्यामुळे पेट्रोलपंप मालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.