नाशिक : महामार्गावर उड्डानपुलावर हॉटेल सेव्हन हेव्हन समोर क्रुझनर व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात वृध्द महिला ठार झाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की, मुबंई महामार्गावर उड्डानपुलावर हॉटेल सेव्हन हेव्हन समोर वेगाने जाणारे क्रुझनर गाडी ( एम एच ४१, व्ही, ०५८२ ) ने शनिवारी मध्यरात्री २ वाजेस्या सुमारास पुढे असलेल्या कंटेनर ला पाठिमागुन ठोस मारली . या अपघातात क्रुझनरमधील धुडकूबाई नागु पवार (८२),आरती गणेश आहिरे,ताराबाई नामदेव गुजरे,भारताबाई संजय पवार व अलकाबाई खंडू पवार (रा.सर्व कळवण) या महिला जखमी झाल्या. त्यातील गंभीर जखमी झालेल्या धडकूबाई पवार यांना गंभीर अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी गणेश आहेर यांनी दिलेल्या फियार्दी वरून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महला पोलिस उप निरीक्षक फडोळ करीत आहेत.