नाशिक – घराचे बांधकाम करतांना दोघे कामगार खाली कोसळले; एक जण जागीच ठार तर महिला जखमी
नाशिक : येथील स्वामी विवेकानंद भागात जुन्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना काम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पहाडावरून दोघे कामगार खाली कोसळले. यात एक जण जागीच ठार झाला असून दुसरी सतरा वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर भागात पंढरीनाथ खैरनार यांच्या जुन्या घराचे नूतनीकरणाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी याठिकाणी काम करणारे गंगासागर सनेही राज भर ( ४६,रा. गौतम नगर, अंबड-सातपूर लिंक रोड) हे खाली कोसळले. त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर काजल लल्लू कोल ( १७,रा. तपोवन ,पंचवटी) ही सतरा वर्षे महिला देखील पहाडावरून पडली असून ती गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करीत आहे
गांधी छत्रीजवळ एक जण मृतावस्थेत आढळला
नाशिक – नाशिकला गंगाघाट भागात गांधी छत्रीजवळ एक जण मृतावस्थेत आढळला. थंडीने गारठून त्याचा मृत्यु झाल्याचा संशय आहे. रविवारी (दि.९) सकाळी नउच्या सुमारास पंचवटी कारंजा बीट मार्शलचे पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना लोकांची गर्दी दिसली म्हणून पोलिस शिपाई देशमुख यांनी चौकशी केली असतांना थंडीने गारठून श्वासोश्वास बंद पडल्याने एकाचा मृत्यु झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नवीन बिटको रुग्णालयाजवळ एक जण मृतावस्थेत आढळून आला
नाशिक – नाशिक रोडला दुर्गा उद्यान परिसरातील नवीन बिटको रुग्णालयाजवळ सिमेंटच्या पाईपच्या आश्रयाने राहणारा एक जण तेथेच मृतावस्थेत आढळून आला आहे. साधारण पंचेचाळीस ते पन्नास वषार्चा असावा त्याची ओळख पटलेली नाही. काही तरी आजाराने तो सिमेंटच्या पाईपमध्ये पडलेला मिळून आला. याप्रकरणी रामदास सोमनाथ कनोजे यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अंबिका संपदा रेसीडेन्सी मध्ये भाजलेल्या महिलेचे निधन
नाशिक – रविशंकर मार्गावरील अंबिका संपदा रेसीडेन्सी मध्ये भाजलेल्या महिलेचे निधन झाले. संपदा संतोष देशपांडे (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – रविवारी (दि.९) सायंकाळी राहत्या घरी महिलेची साडी पेटल्याने ती ४० टक्के भाजली तिला उपचारासाठी पायनर हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले तेथून आडगाव मेडीकल कॉलेज येथे उपचार सुरु असतांना डॉ. विजय सानप यांनी मृत घोषीत केले. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या
नाशिक – म्हसरुळ परिसरातील पुष्पकनगर भागात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रवीण रमेश बिरारी (४५, पुष्पकनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी रविवारी (दि.९) सायंकाळी मृत प्रवीण याने घरातील बेडरुममधील पंख्याच्या ॲगलला दोरीने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यास प्रफूल रमेश बिरारी याने उपारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.